Type Here to Get Search Results !

आटपाडी : य.पा.वाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी “यांची” निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील यपावाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आकाराम मोरे यांनी राजीनामा दिल्याने यपावाडी ग्रामपंचायत उपसरपंचपद रिक्त होते. परंतु या रिक्त झालेल्या  उपसरपंचपदी प्रा. सदाशिव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


सुरुवातीला यपावाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जेष्ठ नेते आकाराम मोरे यांना संधी देण्यात आली होती. परंतु कार्यकाल पूर्ण झाल्याने आकाराम मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. यावेळी प्रा. सदाशिव मोरे यांना संधी देण्यात आली. काल दिनांक १६ रोजी झालेल्या निवडीमध्ये प्रा. सदाशिव मोरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.


निवडी नंतर ग्रामपंचायत कार्यालयात प्रा. सदाशिव मोरे यांचा जेष्ठ नेते विष्णुपंत चव्हाण, आकाराम मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संभाजी माने, राजेश चव्हाण, अजित चव्हाण, आकाश तळे, धनश्री चव्हाण, जयश्री चव्हाण, उज्वला चव्हाण, तुषार चव्हाण, सुनील मोरे,  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक धिरज मोरे यांनी कामकाज पहिले.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies