Type Here to Get Search Results !

आटपाडी : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची खटाव येथे बदली : बदलीचे आदेश प्राप्त



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांची बदली झाली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विकास सेवा मधील सहाय्क्क गट विकास अधिकारी गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये मुक्तेश्वर माडगुळकर यांची बदली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव पंचायत येथे झाली आहे.


आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची बदली झाल्यावर मुक्तेश्वर माडगुळकर यांनी आटपाडी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. आटपाडी पंचायत समिती येथे रुजू झाल्यावर त्यांनी पंचायत समिती कर्मचारी शिस्तीसोबतच कामकाजाला गती दिली होती. जिल्हामध्ये पंचायत समितीचे काम दुसऱ्या क्रमांकावर आले होते. 


रोजगार हमी कामाला गती देण्याबरोबरच त्यांनी घरकुल योजनेसाठी प्रभावीपणे काम केले. सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारींचे निराकारण करत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कामाध्ये अचूकता ठेवत अनेक कामाच्या फाईली त्यांनी मार्गी लावत विकास कामांना गती दिली. त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले असून त्यांच्या रिक्त जागी अद्याप कोणाचीही नेमणूक झाली नाही.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies