Type Here to Get Search Results !

सांगली लोकसभा लढविण्याबाबत काँग्रेसच्या विशाल पाटलांचे खुले पत्र....



माणदेश एक्सप्रेस न्युज/ सांगली : सांगली लोकसभा कोणत्याही परिस्थितीत लढण्याबाबत काँग्रेस नेते विशाल पाटील ठाम असून त्यांनी याबाबत सांगली लोकसभेतील जनतेला खुले पत्र लिहले असून, ‘सांगलीचा गड केवळ लढवायचा नव्हे तर जिंकायचा आहे’


 असा संदेश दिला असल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार असली तरी, यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.


विशाल पाटील यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे, मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झाले आहे.


स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. 


त्यांच्या या पत्रामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार असून, भाजपचे संजयकाका पाटील व शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्यात दुरंगी होणारा सामना मात्र आतार तिरंगी होणार असल्याचे संकेत विशाल पाटील यांनी दिल्याने संजयकाका पाटील यांचीसाठी सुरुवातील एकतर्फी होणारी निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे.


विशाल पाटील यांनी लिहलेले पत्र वाचण्यासाठी क्लिक करा.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies