Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच करणार लखनौ मधील २०० एकर जमिनींबाबतचा उलगडा

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.


लखनऊ ते लंडन काय प्रकरण आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “लखनऊमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केलीय. 800 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे. मी योग्यवेळी माीहिती देईन” तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “मी सरळ, साधा माणूस आहे. सत्ता, पैशाचा मोह नाही. फाटका माणूस आहे. गोरगरीबांमध्ये असतो. पैशाचा, खोक्याचा मोह कोणाला आहे? हे महाराष्ट्रातील जनता जाणते” असं एकनाथ शिंदे म्हणाले.


उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “ते म्हणत होते की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचय. पालखीत बसवायच आहे. पण स्वत:चा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिक, कार्यकर्त्याची किंमत नसते. मला पदाचा, सत्तेचा मोह नव्हता. शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली, त्याचं मी सोनं केलं”. राजा का बेटा राजा नही बनेगा, मेहनत करेगा वो राजा बनेगा असं तुम्ही म्हणता, यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “कर्तुत्वाच्या जोरावर माणसाने पुढे आलं पाहिजे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, हे घरगडी समजतात. कार्यकर्ते मोठे झाले की, भिती वाटते. जे शिवसेना सोडून गेले ते सर्व चुकीचे आहेत का?”




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies