Type Here to Get Search Results !

नागज : जांभूळवाडी जवळील अपघातील मृत्यांचा आकडा पाचवर : गंभीर जखमीवर उपचार सुरुमाणदेश एक्सप्रेस न्युज : क.महांकाळ : जत मार्गावर क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघातामधील मृत्यूंची संख्या वाढली असून, या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. 14 ते 15 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

 

विजयपूर-गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जतवरुन येणाऱ्या जत-मुंबई लक्झरी बसला क्रुझर जीपने धडक दिली. या जीपमधून लग्नाचे वऱ्हाड प्रवास करत होते. या जीपमध्ये 14 ते 15 जण होते. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप लक्झरी बसला जाऊन धडकली. 


या अपघातामध्ये जीपच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभावरुन परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ आणि जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.   तिघांची जखमींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies