बँक, फायनान्स, खाजगी पतसंस्था यांचे हप्ते पुढे ढकला ; चेक बाउन्स करू नका ; विराज शिंदे यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

बँक, फायनान्स, खाजगी पतसंस्था यांचे हप्ते पुढे ढकला ; चेक बाउन्स करू नका ; विराज शिंदे यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 


बँक, फायनान्स, खाजगी पतसंस्था यांचे हप्ते पुढे ढकला ; चेक बाउन्स करू नका ; विराज शिंदे यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
देवापूर/वार्ताहर : बँक, फायनान्स, खाजगी पतसंस्था यांचे हप्ते पुढे ढकला व चेक बाउन्स करा नका अशी मागणी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
 कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यु (लोकॅडाऊन) सारखे अनेक चांगले आणि मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा परिणाम माण-खटाव तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या कामावर, पगारावर होत आहे आणि झाला आहे. तसेच सर्वांचे गाड्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत. चालू महिन्यात विचार करता व्यवसाय शून्य झाला आहे. 
तसेच महिला बचत गटांना दिलेल्या काही फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. महिलांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हप्ते कसे भरायचे हा मोठा प्रश्न आहे. मालवाहतूक, पॅसेंजर गाड्यांचा व्यवसाय खूपच कमी झाला आहे. त्यांना गाडीचे हप्ते भरणे सध्या शक्य होताना दिसत नाही. तरी पुढील 1 ते 2 महिन्याचा EMI हप्ता पुढे ढकलावा व चेक बाऊन्स चा दंड वसूल करू नये. महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना, फायनान्स कंपनी यांना वसुली न करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा  माण- खटाव युवक काँग्रेसपार्टी च्या माध्यमातून कर्जदार बचाव अभियान राबवून भविष्यात संबधित कंपन्यांना विरोधात लॉक डाऊन उटल्यानंतर लगेच जन आंदोलन करण्यात येईल  असा इशारा  सातारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे, महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेस सचिव दादासाहेब काळे, माजी नगराअध्यक्ष विजय धट, खटाव युवक अध्यक्ष सचिन घाडगे, सातारा सरचटणीस निलेश काटे, पंकज पोळ, माण- खटाव युवक काँग्रेस पक्षाचे  सरचटणीस, डॉ. सागर सावंत यांच्या सह्या आहेत.   


Join :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments