आईचे निधन झाले असतानाही मुलीने दिली दहावीची परीक्षा

आईचे निधन झाले असतानाही मुलीने दिली दहावीची परीक्षा


आईचे निधन झाले असतानाही मुलीने दिली दहावीची परीक्षा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/वार्ताहर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व बारावी ची बोर्ड परीक्षा सर्वत्र चालू आहेत. त्यामध्ये मुलांना परीक्षेत व्यत्यय येऊ नये यासाठी शासनाकडून काळजी घेतली जात आहे. परीक्षा तणाव मुक्त, कॉपीमुक्त व्हावी यासाठी दक्षता घेतली जात आहे. अशातच काही मुलांना दुःखाच्या क्षणाचा सामना करावा लागत आहे. माळशिरस तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर असतानाही एक जिद्द आणि प्रेरणा देणारे हे विद्यार्थी दुखः बाजूला ठेवून हिमतीने परीक्षा देत आहेत.
काल सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय केंद्रातील अशी पहिलीच घटना आहे. मांडवेच्या रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी कु. नम्रता अशोक राऊत हिच्या आईचे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. एकीकडे आईच्या जाण्याचे दुःख असताना आईला डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलगी दुःख विसरून पेपरला गेली.
 या घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना मिळाली तेंव्हा सर्व शिक्षकांनी नम्रताला धीर दिला आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन धाडसाने परीक्षा देण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. या मुलीचे वडील अशोक राऊत हे शेती आणि मजुरी करतात. आई आजारी असताना न डगमगता नम्रता घरातील सर्व कामे करून  पेपरला येत आहे. खरच जर अशा मुलांना दुःखातून बाहेर काढून प्रोत्साहन दिले तर नक्कीच ही मुले आयुष्यात काहीतरी घडवू शकतात.
या मुलीला परीक्षेसाठी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक पवार, सरगर व इतर सर्वानी तिला योग्य मार्गदर्शन केले म्हणून ही मुलगी आज अशा दुःखतही चांगल्या प्रकारे पेपर देऊ शकली. खरे तर या विद्यार्थिनीचे सर्व शिक्षकांचे आणि तिच्या कुटुंबियांचे कौतुक होत आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments