'जनता कर्फ्यू' असताना हॉटेल उघडे ठेवले ; आटपाडीत एकावर गुन्हा दाखल

'जनता कर्फ्यू' असताना हॉटेल उघडे ठेवले ; आटपाडीत एकावर गुन्हा दाखल


'जनता कर्फ्यू' असताना हॉटेल उघडे ठेवले आटपाडीत एकावर गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जनता कर्फ्यू आहे चे माहिती असताना सुद्धा हॉटेल उघडे ठेवल्याबद्दल आटपाडीतील हॉटेल व्यवसायिक उत्तम शंकर माळी यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिका माहित अशी की, सपोनि श्री पाटील व सपोफो भाऊराव भांगरे हे सकाळी ०७.०० ते २१.०० पर्यंत पर्वत कोरोना व्हायरस साथीच्या रोगाच्या प्रतिबंधकात्मक उपाययोजनेसाठी लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यू संदर्भात मोटार सायकलवरुन पेट्रोलिंगकरीता आटपाडी शहरात पेट्रोलींग करीत असताना सकाळी 07.45 वा आटपाडी आबानगर चौकाजवळ असलेले हॉटेल अर्नव हे चालु असलेचे दिसले. हॉटेल मालक उत्तम शंकर माळी वय 52 वर्षे रा मापटेमळा यांना हॉटेल चालविण्याचा परवाना आहे का? यांची विचारणा केली असता त्यांनी हॉटेल चालविण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. कोरोना व्हायरस साथीच्या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी मा.जिल्हा दंडाधिकारी सांगली यांचेकडील क्र.गृह.1/कार्या-6/कोरोना आर आर-06/2020दि.20/03/2020 अन्वये पारिता केलेल्या आदेशाचे आरोपी उत्तम शंकर माळी यांनी उल्लघंन करुन त्यांनी त्यांचे अर्नव हाँटेल हे सकाळी  हाँटेल हे सकाळी 07.45वा बेकायदा, बिगर परवाना खादय विक्रीचा परवाना नसताना देखील हॉटेल चालु ठेवलेल्या त्यांचेविरुदध भा.द.वि.स.कलन 188 सह आपत्ती व्यवस्थपन अधिनयम 2005 चे कलम 51 सह मुंबई पोलीस अधिनियम कलम 33W प्रमाणे त्यांचेविरुदध सपोफो भाऊराव भांगरे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


 


Post a comment

0 Comments