Type Here to Get Search Results !

एन.डी.एम.जे.संघटनचे सांगोला तालुका अध्यक्ष वैभव काटे यांच्या  मागणीला यश ; अनु.जाती जमातीसाठी  असलेला 15 % निधी जीवनावश्यक वस्तुसाठी होणार खर्च 


एन.डी.एम.जे.संघटनचे सांगोला तालुका अध्यक्ष वैभव काटे यांच्या  मागणीला यश ; अनु.जाती जमातीसाठी  असलेला 15 % निधी जीवनावश्यक वस्तुसाठी होणार खर्च 
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वार्ताहर : सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मागासवर्गीयांसाठी असलेल्या पंधरा टक्के निधी मधुन अनुसूचित जाती-जमाती च्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणेकामी खर्च करण्यात यावा. अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष वैभव काटे यांनी सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला दखल घेवून गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सर्व ग्रामपंचायतींना यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश दिले. 


हे ही वाचा :- दक्षता कमिटी नावालाच; ग्रामसेवक तलाठी, गावाकडे फिरकेनात; सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती


केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तीन मे पर्यंत लोंकडाऊन घोषित केला आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता गटविकास अधिकारी यांनी मागासवर्गीयांचा 15 टक्के निधी अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे कामे खर्च करण्यात यावा, असा तात्काळ आदेश सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना त्वरित द्यावा अशी मागणी एन .डी .एम. जे. वतीने करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सर्व ग्रामपंचायतींना यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.
तालुक्यातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती घ्यावी व अडचण भासल्यास संपर्क करावा असे आवाहन  एन.डी.एम.जे. संघटनेचे वैभव काटे  यांनी केले केले असल्याची माहिती एन.डी.एम.जे.संघटनेचे सोलापुर जिल्हा सचिव पंकजकुमार काटे यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies