लेकीच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजनच्या माध्यमातून अन्नदान 

लेकीच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजनच्या माध्यमातून अन्नदान 


लेकीच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजनच्या माध्यमातून अन्नदान 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : देशामध्ये व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने अनेक गरीब कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असून उपासमार सुरू आहे. अशावेळी येथील आटपाडी येथील कॉन्ट्रॅक्टर अमोल नानासो माळी हे लोकांच्या मदतीला धावून आले. त्यांची कन्या संस्कृती हिच्या वाढदिवसानिमित्त बस स्थानक व ग्रामीण रुग्णालय येथे गरीब व गरजू लोकांना मोफत शिव भोजन वाटप करण्यात आले.
संस्कृती ही युनिवर्सल इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये शिकत असून तिने आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. तिच्या पालकांनी तिची निरागसता गोरगरीब बद्दल असलेली आपुलकी व दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती पाहून तिच्या पालकांनी संस्कृतीच्या वाढदिवसानिमित्त अपंग व गरजू लोकांना मोफत शिव भोजन देऊन आपल्या लेकीची इच्छा पूर्ण करत अनोखा वाढदिवस साजरा केला.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments