Type Here to Get Search Results !

अजनाळे येथील गरीब कुटुंबांना  धान्य  व  किराणा बाजार  वाटप करून  विष्णू देशमुख  यांनी जोपासली  सामाजिक बांधिलकी : पो.नि. राजेश गवळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले


लॉकडाऊन मध्ये  अजनाळे येथील गरीब कुटुंबांना  धान्य  व  किराणा बाजार  वाटप करून  विष्णू देशमुख  यांनी जोपासली  सामाजिक बांधिलकी : पो.नि. राजेश गवळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने राज्यात संचारबंदी,  लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील गोरगरीब, गरजू कुटुंबातील नागरिकांची उपासमार होऊ लागली असून  गोरगरीब  व  रोजंदारीवर  काम करणाऱ्या  कुटुंबाला  दोन वेळच्या  जेवणाचा  प्रश्न  निर्माण झाले आहे.  देशावर  कोरोना चे  संकट आहे.  या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चा आदेश जारी करण्यात आला आहे.  त्यामुळे  अत्याआवश्यक सेवा वगळता  सर्व बाजारपेठा  बंद आहेत.  गोरगरिबांच्या चुली बंद पडत आहेत. रोजगार  उपलब्ध नसल्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांनी  कसा उदरनिर्वाह करायचा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच सामाजिक कामात बांधीलकी जपणारे तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे  गावातील उद्योगपती विष्णू देशमुख व त्यांच्या दानशूर सहकाऱ्यांनी गावात सुमारे २०० कुटुंबांना गहू १० किलो, तांदूळ २ किलो, साखर २ किलो, तूर डाळ १ किलो, गोडेतेल १ किलो चहा पावडर, साबण इत्यादी जीवनावश्यकचे वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे, उद्योगपती विष्णू देशमुख, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत चंदनशिवे, विनायक कोळवले, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, सरपंच अर्जुन कोळवले, ग्रामसेवक शहाजीराव इंगोले, गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, युवा नेते हनुमंत कोळवले, कोतवाल नवनाथ इंगोले, आरोग्य सेवक अशोक कलाल, आरोग्य सेविका सुजाता गुरव, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल विभुते, उपसरपंच धर्मराज शेंबडे, युवा नेते अमोल खरात, पोलीस पाटील संतोष भंडगे, बापू कोळवले, सुरेश धांडोरे, अमित शेंबडे, सुनील धांडोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies