जनता कर्फ्यू असताना मटन विक्री करणे पडले महागात ; पोलिसात गुन्हा दाखल 

जनता कर्फ्यू असताना मटन विक्री करणे पडले महागात ; पोलिसात गुन्हा दाखल 


जनता कर्फ्यू असताना मटन विक्री करणे पडले महागात ; पोलिसात गुन्हा दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत आठवड्यातील प्रत्येक रविवार, मंगळवार व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आटपाडीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने घेतला होता. या जनता कर्फ्यू ला आज आठवड्यातील पहिल्या गुरुवारी नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला गेला. परंतु जनता कर्फ्यू असताना मटन विक्री करणे आटपाडीतील मटन विक्रेत्याला महाग पडले असून आटपाडी पोलीस ठाणेमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनता कर्फ्यू आहे हे माहित असूनही आटपाडी येथील मटन विक्रेता हर्षद मिरा खाटीक वय २८ हा आपल्या दुकानामध्ये मटन विक्री करत होता. यावेळी मटन विक्री करताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सींग पाळले गेले नाही. दुकानात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाणे येथे  भादविस कलम १८८, २७१, २९० प्रमाणे खटले दाखल करण्यात आले आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments