जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी सहभागी होतात..... ; तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मंत्री जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न


जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी सहभागी होतात..... ; तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मंत्री जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : फळपीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. तासगावच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा अवगत करण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी थेट उपसमितीच्या बैठकीतच शेतकऱ्यांना फोन लावला. जयंत पाटील यांच्या या कृतीने मंत्रिमंडळाच्या उपसमित्याच्या बैठकीत एक वेगळाच पॅटर्न बघायला मिळाला.
दरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपले मत मांडताना आधी महापूर मग अतिवृष्टी नंतर अवकाळी पाऊस आणि आता कोरोना या सगलच्या संकटांमुळे किती नुकसान झाले याची व्यथा मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर मांडली. समितीने शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले.
फळपिके हे बहुवार्षिक असल्याकारणाने फळपिकांना वर्षभर संरक्षण मिळावे अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी या बैठकीत मांडली. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादकांना विम्यासाठी प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्यात यावी असे मतही त्यांनी या बैठकीत मांडले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाविकासआघाडी सरकार प्रयत्न करणार असे आश्वासन जयंत पाटील बैठकीनंतर दिले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad