पाचेगाव बुद्रुक येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण माणदेश एक्सप्रेस न्युज

पाचेगाव बुद्रुक येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण माणदेश एक्सप्रेस न्युज


पाचेगाव बुद्रुक येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
माणदेश एक्सप्रेस न्युज
पाचेगाव बुद्रुक : पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला, जि.सोलापूर  येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सरपंच प्रमोद दौंड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी विकास सोसायटी चेअरमन देवा खरात, शिवभक्त सुग्रीव बिले, भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष शंकर बिले, आधार फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन सुतार, धनगर संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हा युवाध्यक्ष तुकाराम काबुगडे, तंटामुक्ती समिती सदस्य शनि दौंड, किशोर बिले, प्रमोद दौंड, संगणक प्रचालक संजय खरात, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिजीत ढेमरे हे उपस्थित होते. 


भन्नाट मराठी वेबसिरीज "बोंबाची बाराखडी" चा प्रोमो खास आपल्यासाठी 
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथे  श्री गणेश रोपवाटिकाचे मालक नारायण संपत घोडके यांनी मोफत दिलेल्या सिताफळ, उंबर, जांभूळ, आंबा, पेरुच्या पंचवीस रोपांचे वृक्षारोपण ग्रामदैवत म्हसोबा मंदिर परिसरात आधार फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन सुतार, अभिजीत ढेमरे यांनी केले.


Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments