सरकारचा कांदा, बटाटा, डाळीच्या किंमतीबाबत सर्वसामान्यांना दिलासा 

सरकारचा कांदा, बटाटा, डाळीच्या किंमतीबाबत सर्वसामान्यांना दिलासा 


 


सरकारचा कांदा, बटाटा, डाळीच्या किंमतीबाबत सर्वसामान्यांना दिलासा मुंबई : सणासुदीच्या दिवसात कांदा, बटाटा आणि डाळींच्या दरात वाढ होताना दिसतेय. पण दिवाळीच्या तोंडावर सरकारने या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाची पाऊलं उचलली आहेत. सध्या  कांद्याची किंमत ६८ रुपयांच्या आसपास आहे. कांद्याची किंमत स्थिर राहण्यासाठी सरकारने याची निर्यात थांबवली होती.


 


दिवाळीपर्यंत साधारण २५ हजार टन कांदा येण्याची शक्यता आहे. कांद्याचं नवं पीक आल्यानंतर देखील किंमत कमी होईल. बटाट्याची किंमत वाढू नये म्हणून इम्पोर्ट ड्युटीवर १० लाख मॅट्रीक टनवर १० टक्के कोटा ठरवण्यात आलाय. सरकारने हा कोटा ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू केलाय. सध्या बटाट्याची सरासरी किंमत ४२ रुपयांपर्यंत आहे. डाळींच्या किंमती सध्या स्थिर झाल्या आहेत. साखरेची सरासरी किंमत सध्या ४० रुपये किलोपर्यंत आहे. जी यावर्षी स्थिर राहील.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments