Type Here to Get Search Results !

...म्हणून १८ वर्षाखालील मुलांना कोरोना लस दिली जाणार नाही




 ...म्हणून १८ वर्षाखालील मुलांना कोरोना लस दिली जाणार नाही 



नवी दिल्ली : लसीकरण संदर्भात ज्या आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्स आहेत त्यानुसार ही लस लहान मुलांना दिली जाणार नाही. १८ वर्षाखालील मुलांना कोरोना लस दिली जाणार नसल्याचा खुलासा केला गेला आहे. या विषयी अधिक माहिती देताना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले, देशात ३० कोटी नागरिकांना ही लस देण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, सुरक्षा क्षेत्र व अन्य गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.



डॉ. पॉल यांच्या म्हणण्यानुसार कोरोना लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत त्या प्रौढ नागरिकांवर झाल्या आहेत. शिवाय कोरोना संसर्ग होण्यात प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत. १८ वर्षांखालील मुलांवर या लसीच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर या लसीचे काय परिणाम होतील याचा डेटा उपलब्ध नाही. अर्थात याचा अर्थ लहान मुलांना कोरोनाचा धोका नाही असा नाही.



तरीही मुळातच लहान वयात रोगप्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यामुळे या वायोगटावर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. या वयोगटात ज्यांना कोरोना लागण झाली त्यांच्या मध्ये फारच सौम्य प्रभाव दिसला आहे. ब्रिटन, युरोप, स्पेन, ऑस्ट्रिया येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनात एप्रिल मध्ये ३ ते १८ वयोगटातील ५८५ मुलांना कोरोना लागण झाली होती. हा रिसर्च ८२ हॉस्पिटल मध्ये केला गेला होता. लागण झालेल्यापैकी ६२ टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि ८ टक्के रुग्णांना आयसीयु मध्ये ठेवावे लागले होते. त्यातील चार मुलांचा मृत्यू झाला असला तरी या चार जणांना अन्यही आजार होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies