Type Here to Get Search Results !

राजेवाडीच्या साखर कारखान्यावरून साखर घेवून फरार झालेल्या दोघांना अटक ; २६,९६,१४६ रुपयाचा मुदेमाल जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेची कारवाईराजेवाडीच्या साखर कारखान्यावरून साखर घेवून फरार झालेल्या दोघांना अटक ; २६,९६,१४६ रुपयाचा मुदेमाल जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेची कारवाई  


सांगली : राजेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्यावरून दिनांक ९ रोजी ३० टन साखर घेवून फरार झालेल्या ट्रक ड्रायव्हर व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथील मेसर्स गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीने राजेवाडी येथील श्री सद्गुरु साखर खारखाना यांचेकडुन खरेदी केलेल्या साखरेतील ९,९६,१४६/- रु किंमतीची ३० टन साखर ट्रक क्रमांक MH 45 AF 4009 मध्ये भरुण ट्रक ड्रायव्हर ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमीटेड रांजणगाव एमआयडीसी ता.शिरुर जि पुणे येथे पोहच करण्यास निघाला होता. होती परंतु सदरची साखर  ट्रक चालकाने पळवून नेला. या गुन्ह्याची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली असून याबाबत मेसर्स गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीच्या वतीने तुषार दत्तात्रय मेहता यांनी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  


त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस , पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व कर्मचारी यांनी सदर गुन्हयाचे ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचे माहिती घेऊन पुढील तपास चालु केला. या गुन्हयाचे अंनुषगाने माहिती घेत असताना सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बलवगडे याचे गायरानात एक संशयास्पद काहीतरी भरुन ट्रक थांबला असल्याबाबत माहिती मिळाली , मिळाले माहिती प्रमाणे वरील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता, त्या ट्रकमध्ये दोन इसम मिळाले त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव १) अनिल शरणाप्पा माळी वय-२१ २) विकास शिवाजी भोसले वय-३५ रा, दोन्ही रा मळणगाव ता कवठेमहकाळ असे असल्याचे सागितले.  


त्यावेळी त्याचे कब्जात असले ट्रकमध्ये आत पाहता ट्रक मध्ये साखरेने भरलेली पोती मिळाली या बाबत त्या दोघाकडे चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी त्या दोघाना विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी सागितले की, आम्ही राजेवाडी सदगुरु साखर कारखाना येथील गौतम शुगर ट्रेडिग कंपनीची ३० टन साखर आम्ही एम एच ४५ ए एफ ४००९ हा नंबर लावुन साखरेचा माल हा ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमेटेड एमआयडीसी शिरुर पुणे येथे येथे पोहच करणेचा होता. परंतु आम्ही दोघानी मिळुन माल भरले आमचे ताबेतील असले गाडीचा वरील नंबर बदलुन माल भरले नंतर गाडीचा नं एम एच ०९ -५९७६ हा लावुन ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमेटेड एमआयडीसी शिरुर पुणे या ठिकाणी न पोहचविता तो आम्ही स्परस्पर विक्री करणेसाठी आणले बाबत सागितले. त्यावेळी सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी त्याचे कब्जातील ट्रक व ३० टन साखर माल असा एकुन २६,९६,१४६/- रुपयाचा मुदेमाल जप्त करुन पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाणे येथे रिपोर्टने आरोपी मुदेमाल जमा करण्यात आला.  


सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम,पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शानाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अच्युत सुर्यवंशी , जितेद्र जाधव, अनिल कोळेकर, संदीप गुरव, सतिश अलदर, आमसिध्दा खोत, राजु मुळे, मेघराज रुपनर ,संजय कांबळे, राहुल जाधव, वैभव पाटील मुदतसर पाथरवट, विकास भोसले, बजंरग शिरतोडे, सायबर पोलीस ठाणेकडील ,कॅप्टन गुंडवाडे, यांनी पार पाडली.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies