Type Here to Get Search Results !

फिट इंडिया अभियान अंतर्गत वर्ल्ड ड्युअल ऑर्गनायझेशन वतीने खेळाडू प्रभातफेरी व ड्युअल खेळाचे प्रशिक्षण संपन्न

 
फिट इंडिया अभियान अंतर्गत वर्ल्ड ड्युअल ऑर्गनायझेशन वतीने खेळाडू प्रभातफेरी व ड्युअल खेळाचे प्रशिक्षण संपन्नखानापूर : खानापूर तालुक्यातील पळशी येथे फिट इंडिया अभियान अंतर्गत वर्ल्ड ड्युअल ऑर्गनायझेशन वतीने प्रथमच आयोजित खेळाडू प्रभातफेरी व ड्युअल क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन मान्यावराच्या हस्ते झाले. जिल्हातील विविध तालुक्यातून खेळाडू या ड्युअल क्रीडा प्रशिक्षणास सहभागी झाले असून रविवारी प्रभातफेरी व ड्युअल खेळाचे प्रशिक्षण संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व वर्ल्ड ड्युअल ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष श्याम राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक शिबीर संपन्न झाले. सवाते संघटनेचे मुख्यप्रशिक्षक हबीब मुलाणी यांच्या पुढाकाराने या खेळाडू प्रभातफेरी व ड्युअल खेळाचे प्रशिक्षण पळशी येथे आयोजित करण्यात आले. पळशी येथील द्राक्ष बागायतदार जाधव यांचे हस्ते शिबिराचे शुभारंभ करण्यात आला. तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्याम राक्षे, मुख्य प्रशिक्षक हबीब मुलाणी , प्रशिक्षक समीना मुलाणी, सायली राक्षे यांचे मार्गदर्शन लाभले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies