Type Here to Get Search Results !

“आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू” : अमोल कोल्हे




पुणे : आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 391वी जयंती. शिवजयंती साजरी करण्यावर आखलेल्या निर्बंधांवर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवनेरीवर आयोजित सोहळ्यात अमोल कोल्हे असं म्हणाले की, शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातलेत त्यामुळे माझाही हिरमोड झाला आहे. आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू. कोरोनाचे नियम पाळूनच आपण शिवजयंती साजरी करू.'




दरम्यान दुसरीकडे रायगडावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई करण्यात आली. मात्र ही विद्युत रोषणाई करताना डिस्को लाइट वापरले गेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर डॉ. अमोल कोल्हेंनी काहीशी सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे म्हटले की, 'जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही आहे पण माध्यमांमधून वाचनात आलं आहे. रायगडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे'. याप्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला होता. रायगडाला अशा प्रकारची डिस्को लाइट लावणे म्हणजे ऐतिहासिक ठिकाणाचा अपमान असल्याची टीका संभाजीराजेंनी केली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies