आरपीआयच्या आयटी सेल चे जिल्हाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे केले आवाहन

आरपीआयच्या आयटी सेल चे जिल्हाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे केले आवाहनआरपीआयच्या आयटी सेल चे जिल्हाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे केले आवाहन 


आटपाडी : आरपीआयच्या (आठवले) आयटी सेल सांगली जिल्हाध्यक्ष विशाल काटे कोरोना पॉझिटिव्ह आले असून संर्पकात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सोशल मिडीयाद्वारे केले आहे.


जिल्हामध्ये आरपीआयच्या आयटीसेल चे काम प्रभावीपणे असून त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे, त्याच बरोबर पक्षाच्या आगामी काळातील वाटचाल यावर त्यांनी सोशल मिडीयातून पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोशल मिडीयामध्ये ट्रोल झाले तर ट्रोलर्स ही त्यांनी रामदास आठवले यांची बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देण्याचे काम करत आहेत.


आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर ते त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments