वाढत्या कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

वाढत्या कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


वाढत्या कोरोना प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली : कोरोना  विषाणूच्या  वाढत्या  प्रादुर्भावास  आळा  बसण्यासाठी राज्य शासनाकडील दि. 13 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशातील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 14 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये सांगली  जिल्ह्यामध्ये   प्रतिबंधात्मक आदेश (Break The Chain Order)  दि. 01 मे 2021 रोजीचे  सकाळी 7 वाजेपर्यंत पारित करण्यात आला आहे. राज्य शासनाकडील दि. 20 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये दि. 13 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 14 एप्रिल 2021 रोजीच्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये पुढीलप्रमाणे बदल केला आहे.


सर्व किराणाभाजीपाला दुकानफळ विक्रेतेडेअरीबेकरीमिठाईसर्व प्रकारची खाद्य दुकाने ( मटनचिकनपोल्ट्रीमासे  अंडी यांसह)शेती विषयक अवजारे  शेती उत्पादनांची दुकानेपेट फूड शॉप (Pet Food Shop), व्यक्ती अथवा संस्थासाठी पावसाळ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंची दुकाने सकाळी  07.00  वाजल्यापासून ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच सुरु राहतील. या  दुकानामधून  घरपोच  सेवा  सकाळी  07.00 वाजल्यापासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल.


या व्यतिरिक्त  यापूर्वी  आदेशाने  बंदी  अथवा  सूट  देण्यात  आलेल्या  क्रिया / बाबी  कायम  राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनीशासनाने त्या - त्या  विभागासाठी / आस्थापनांसाठी  नेमून  दिलेल्या  मार्गदर्शक  सूचनांचे  पालन  करणे बंधनकारक  राहील.


 सदर  आदेशाची  अंमलबजावणी  पोलीस  अधीक्षक,  Incident Commander  तथा  तालुका  कार्यकारी  दंडाधिकारीस्थानिक  स्वराज्य  संस्था    सर्व  संबंधित  प्रशासकीय  विभाग प्रमुख यांनी करावी. हा आदेश दि. 20 एप्रिल 2021  रोजीचे  रात्री  08.00 वाजल्यापासून ते  दि. 01 मे 2021  रोजीचे  सकाळी 07.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 

 

Post a comment

0 Comments