झरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीतमाणदेश एक्सप्रेस न्युज I आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे गावाकडे निघालेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांचा संचारबंदीचा फटका बसला. आटपाडी तालुक्यातील प्रवेश करताना झरे येथे जाताना त्यांनी पोलिसांनी अडविले होते. याबाबत खुद्द सदाभाऊ खोत यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.


झरे येथे उद्या दिनांक २० रोजी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाने या बैलगाडा शर्यतीवर बंदी घातलेली आहे. सदरची बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी राज्यातील बैलगाडा संघटना मालकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची झरे येथे भेट घेत सभागृहात आवाज उठविण्याची मागणी केली होती. बैलगाडा संघटना मालकांपुढे बोलताना आमदार पडळकर यांनी याबाबत झरे येथे दिनांक २० रोजी बैलगाडा शर्यत भरवित असल्याचे जाहीर केले. परंतु बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने व याबाबत अजय मराठे यांची न्यायालयात याचिका दाखल असल्याने तसेच या शर्यतीमुळे या याचिकेच्या निकालावर प्रादुर्भाव येणार असल्याचे स्पष्ट करीत पुन्हा यावर न्यायालयात अपिल करून सदरची होणारी शर्यत रद्द करण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने अत्पैद तालुक्यातील झरे परिसरात कलम १४४ लागू करून संचारबंदी अंमलात आणली आहे. याबाबत आमदार पडळकर यांच्या बैलगाडा शर्यतीला पाठींबा देण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत हे झरे याठिकाणी निघाले होते. परंतु पोलीस चेकपोस्टवरच त्यांची गाडी अडविण्यात आली. याबाबत सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाना साधत छकडा गाडी शर्यत रोखण्याकरीता महविकास आघाडी सरकार कडून प्रत्येक स्तरांवरून अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत. आटपाडी तालुका व जवळील गावामध्ये सरकारने कडक नाका-बंदी सोबत संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लावली आहे. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता येथे शेतकरी न्हवे तर अफगाणिस्तानातून आतंकवादी या शर्यतीत भाग घेण्यासाठी येणार आहेत अशी टीका केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured