Type Here to Get Search Results !

धक्कादायक : पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने 9 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी

 





हिंगोली : दिवाळीच्या सणात फटाके फोडून लहान मुलांसह मोठेही आनंद घेतात मात्र, काळजी घेतली नाही तर त्या आनंदावर पाणी पडते अशीच एक दुर्दैवी घटना हिंगोली येथे घडली आहे. पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने 9 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगावात घडलीय. 


पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने साईनाथ घुगे या मुलाचा डोळा निकामी झाला आहे. साईनाथ मामाकडे आईबरोबर दिवाळी साजरी करायला आला होता. मामाच्या घरी फटाके फोडत असताना पेटता फटाका डोळ्यात घुसल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies