Type Here to Get Search Results !

दिघंचीत विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात I दोन लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत



आटपाडी : आटपाडी पोलिसांनी दिघंची येथे झरे-दिघंची रोडवरती एच.पी. पेट्रोल पंपाजवळ विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोन आरोपीसह एक अज्ञात व मारुती ओमनी गाडी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत आरोपीकडून दोन लाख ६५ हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


याबाबत अधिक माहिती अशी की, दिघंची गावी दिघंची-झरे रोडवरती विदेशी मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली होती.


याबाबत सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा होता. यावेळी एच.पी. पेट्रोल पंपाजवळ मारुती ओमनी (एम.एच.१०-सी.९२२२) आली असता गाडीची तपासणी केली. गाडीमध्ये त्यामध्ये ६५,२८०/- रुपयांच्या विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स सापडले. यावेळी पोलिसांनी आरोपी महेश वसंत उबाळे व.व. ४१, रा. जुना वासुंबे रोड, विटा, ता. खानापूर, मंगेश उत्तम जाधव व.व. २६ रा, ढवळेश्वर ता. खानापूर या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर ज्या वाईन शॉप मधून हा माल आणला गेला त्या ड्रिमलॅड वाईन शॉपीच्या मालकावरही महाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोकॉ प्रमोद मारुती रोडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.


सदर कारवाईमध्ये पोहेकॉ महेश आवळे, पोहेकॉ नंदकुमार पवार, पोना उमर फकीर, पोना नितीन मोरे, पोकॉ प्रमोद रोडे यांनी सहभाग घेतला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies