Type Here to Get Search Results !

दाक्षिणात्य अभिनेता धनुषने दिला पत्नीला घटस्फोट I म्हणाला, आम्ही एकमेकापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय



आटपाडी : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता धनुषने सोमवारी आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा सोशल मिडीयाद्वारे केली. धनुषची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या असून तिचे आणि धनुषचा २००४ मध्ये लग्न झाले होते. दोघांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. धनुष बरोबरच ऐश्वर्या हिने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण विभक्त झाल्याची घोषणा देखील केली आहे.



ट्विटरवर शेअर केलेल्या नोटमध्ये धनुषने म्हटले आहे की, “मित्र म्हणून, जोडपे म्हणून, पालक म्हणून आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून १८ वर्षांची सोबत राहिली. आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या निर्णयाचा स्वीकार करावा.” असं म्हणत धनुषने घटस्फोटा बाबतची माहिती दिली आहे. तर, अशाच पद्धतीची पोस्ट ऐश्वर्याने तिच्या इन्स्टा अकाउंटवर देखील केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies