Type Here to Get Search Results !

पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानम्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील देवापुर गावचे  सुपुत्र व सध्या अक्कलकुवा (जि.नंदुरबार) येथे पोलीस उपअधिक्षक पदावर सेवेत कार्यरत असलेले संभाजी सुदाम सावंत यांना त्यांच्या उत्कृष्ठ सेवाकार्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची दखल घेऊन त्यांना "राष्ट्रपती पोलीस पदक" राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.


मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई व गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  संभाजी सावंत हे सन १९८९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्यांनी जळगाव, धुळे, नगर, नाशिक, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, PTC दौंड, तुरची, सोलापूर उत्यादी ठिकाणी त्यांनी राज्याच्या गृह खात्यात उत्कृष्ट अशी सेवा बजावली आहे. 


त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत त्यांना यापुर्वी तीनशेहून अधिक बक्षिसे मिळाली आहेत तसेच २०१८ मध्ये त्यांना "माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह" ("Director General's Insignia") , सन २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानि करण्यात आले होते. 


त्यानी धुळे, जळगाव,सिंधुदुर्ग या ठिकाणी अनेक खून,दरोडे, घरफोडी च्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे केला आहे. नंदुरबार येथील सन २०११ मध्ये झालेल्या जातीय दंगल हाताळण्यात विशेष कामगीरी बजावली होती. नंदुरबार या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री यांचे उपस्थित व हस्ते नागरिकांना आधार कार्ड वाटप कार्यक्रम  तसेच राष्ट्रपती यांच्या नंदुरबार दौरा प्रसंगी बंदोबस्त आखणी करण्या मध्ये अत्यंत मोलाची कामगिरी श्री. सावंत यांनी केली होती.


नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच तुरची, सोलापूर या ठिकाणी सेवेत कार्यरत असताना त्यांनी अत्यंत चांगले पोलीस प्रशिणार्थी घडविले म्हणून त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले होते. पोलीस दलामध्ये राहून जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन  राष्ट्रपतींनी त्यांना २६ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल "राष्ट्रपती पोलीस पदक" जाहिर केले. या पदकाचे वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते त्यांचा गौरव केला. माण देशी संभाजी सावंत यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies