Type Here to Get Search Results !

डिजिटल इंडिया च्या दिशेने अहिंसा पतसंस्थेची यशस्वी वाटचाल : विलासराव देशमुखम्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड येथील नामांकित असलेल्या अहिंसा पतसंस्थेमध्ये नुकतेच क्यू आर कोडचे उद्घाटन  कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख  यांचे हस्ते  करण्यात आले.


यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, भारत देश कृषी प्रधान देश असून पंतप्रधानांच्या प्रेरणेने गेल्या काही वर्षात भारत डिजिटल इंडिया कडे वाटचाल करीत आहे. देश डिजिटल होऊ लागला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर धरून नितिन दोशी यांनी डिजिटल इंडिया प्रमाणे पतसंस्था डिजिटल कशी करता येईल या दृष्टीने अहिंसा पतसंस्थेमध्ये सामन्यातील सामान्य माणूस या पासून वंचित राहू नये म्हणून पतसंस्थेच्या माध्यमातून क्यू आर कोडची सुरुवात केली.


लुनेश खोत विरकर म्हणाले, अहिंसा पतसंस्थेने सुरु केलेला क्यू आर कोडची सुविधा पाहता देश खरच  डिजिटल होतोय असे वाटते. नितिन दोशी यांचे सतत नवं नवीन उपक्रम राबवण्याकडे कल असतो, अहिंसा पतसंस्था ही क्यू आर कोड सुरू करणारी एकमेव पतसंस्था आहे असे मला वाटते. इथून पुढे सर्व संस्था सुरू करतीलही पण कोणतीही नवी योजना सुरु करून ती राबवण्याचे काम अहिंसा करते असे मला वाटते.


जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले, ग्रामीण भागात अशी सेवा देण्याचे काम अहिंसा पतसंस्था करते आहे. आज ग्रामीण भागातील लोकांना ग्राहकांना सुद्धा क्यू आर कोडच्या माध्यमातून पैशाची देवाण घेवाण करता येते त्यामुळे खऱ्या अर्थाने भारत डिजिटल झाला असे मला वाटते.


म्हसवड मध्ये नव्यानेच सुरू झालेल्या वात्सल्य वारीधी गोशाळेस अहिंसा पतसंस्थेने 25000  रु. धनादेश देऊन मदत केली होती. त्या निमित्ताने वात्सल्य वारीधी गोशाळेचे कार्यकर्त्यांनी  नितिन दोशी व अहिंसा पतसंस्थेचे आभार मानले.


म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष व पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नितिन दोशी म्हणाले की, आपला हेतू प्रामाणिक असेल तर कोणतेही कार्य करताना अडचणी येतील पण ते कार्य पूर्ण होतेच. आज अहिंसा पतसंस्था खऱ्या अर्थाने डिजिटल झाली. म्हसवड पंचक्रोशीतील सामान्य लोकांना बँकांमध्ये जाऊन क्यू आर कोडची सुविधा सहज  मिळू शकत नाही, हेच लक्षात घेऊन आम्ही  सामन्यातील सामान्य लोकांना क्यू आर कोडची सुविधा मिळावी यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे. 


नेटविन सिस्टीम ॲण्ड सॉफ्टवेअर प्रा.लि. चे असिं. मॅनेजर वसंतराव फाटके म्हणाले की, मी महाराष्ट्र भर पतसंस्था पहिल्या, चेअरमन पाहिले. परंतु नितिनभाई दोशी सारखे तत्पर, व दातृत्व असणारे चेअरमन संपूर्ण महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच पाहतोय. त्यांचे सामाजिक कार्य तर उल्लेखनीय आहेच परंतु एक पतसंस्था चालवणारा चेअरमन किती क्षमतेचा असावा त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितिनभाई दोशी होय. त्याच बरोबर त्यांनी क्यू आर कोड विषयी माहिती दिली.


या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक महावीर व्होरा, अभिराज गांधी, सोमेश्वर केवटे, प्रितम शहा, म्हसवड मधील व्यापारी भरतशेठ दोशी, भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष परेशशेठ व्होरा, संतोष दोशी, शैलेश गांधी, अमित गांधी, धवल व्होरा, पुष्पराज दोशी, जेष्ठ पत्रकार अण्णा टाकणे, पत्रकार लुनेश विरकर म्हसवड मधील सुजाण नागरिक व पतसंस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज व्होरा यांनी केले तर सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies