Type Here to Get Search Results !

प्रेम निभावता आलं तर ते जिंकतंच..; असे म्हणणारा ‘लगन’ येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला!


मुंबई: प्रेमाचा प्रतीक असलेला गुलाब प्रेमाचा खरा अर्थ सांगून जातो. जेवढे नाजूक फुल तेवढेच बोचरे काटे. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण आहे. प्रेमाची वाट कठीण असली तरी धरलेली साथ शेवटपर्यंत निभावयाला लागणाऱ्या हिंमतीची गोष्ट घेऊन आलेल्या ‘लगन’ या मराठी चित्रपटाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. सुजित चौरे आणि श्वेता काळे ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
‘तुमचं ना.. रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं’..! अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टर मध्ये उधळलेल्या घोडयावरून नववधूच्या वेशातल्या नायिकेला घेऊन जात असलेला जखमी नायक आपल्याला दिसत आहे. जी. बी एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा मराठी चित्रपट ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरमहे गायक या चित्रपटाला लाभले आहेत. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies