इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! २२३ पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर माहिती!

महाराष्ट्र : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ने अभियांत्रिकी उमेदवारांकडून अर्ज मागणी केली आहे. या अंतर्गत मुख्य अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यासोबत इतर पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी १९ एप्रिल २०२२ पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेद्वारे, सहाय्यक अभियंता (ट्रान्स, टेलिकॉम, सिव्हिल) च्या २२३ पदांची भरती केली जानार आहे. याशिवाय जाहिरात क्रमांक 03/2022 अंतर्गत मुख्य अभियंता पदाच्या ४ पदे, अधीक्षक अभियंता पदाच्या १२ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.मुख्य अभियंता या पदासाठी, उमेदवारांना विद्युत इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/टेक्नोलॉजीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. आणि पॉवर सेक्टरमध्ये १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर, सुपरिटेंडिंग इंजीनियर (ट्रान्स) साठी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील एकूण १२ वर्षांचा अनुभावाची मागणी केली आहे.यासाठी असणारी वयोमर्यादा खालीलप्रमाणे: 


कार्यकारी संचालक – ५९ वर्षे

CGM-५० वर्षे

मुख्य अभियंता – ५० वर्षे

अधीक्षक अभियंता – ४५ वर्षे
तसेच, या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. “मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-१९, ७ वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई 400051 यांना अर्ज पाठवायचा आहे. यासाठी खुल्या जाती प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रुपये आणि आरक्षित श्रेणी आणि EWS उमेदवारांसाठी ४०० रुपये अर्जाची फी आकारली जाईल.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured