अजित पवारांचा टोला 'नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, ते कोणत्या पक्षातून आले?


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आणखी एका विधानामुळे महाविकास आघाडीत वातावरण तापण्याची होण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं. राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलं

यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया येत असतानाच अजित पवारांनी नानांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हटलं. ते कोणत्या पक्षातून काँगेस मध्ये आले, याचा त्यांची विचार करावा, अस दादांनी सांगितलं .

भाजप म्हणणार का आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. संघटनेत प्रत्येक पक्ष काम करतो. आमचं महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी असेल तरच १४५ आकडा गाठणं शक्य आहे, असं पवारांनी म्हटलं. 

जिल्ह्यात वेगळ्या घटना घडतात तिथली राजकीय परिस्थिती वेगळी असते वातावरण नीट राहावे असे प्रयत्न होतात. समन्वय नसला, तर प्रश्न उभे होतात. काँग्रेसने पण तालुक्याच्या ठिकाणी भाजप बरोबर संधन बांधलं होतं. त्यामुळे जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा वेडावाकडा परिणाम होणार नाही हे बघावे, असं म्हणत अजित पवारांनी त्यांचे कान टोचले आहेत.

शरद पवार यांच्यावर जातीपातीच राजकरण करतात असा आरोप होतो माञ पहिल्यापासून शरद पवार यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. सर्वांनी मिळून जातीय सलोखा आणि आपलेपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुया, असं अजित पवार म्हणाले.

आगामी निवडणुकीत राज्य स्थरावर महविकास आघाडीत निवडणूक लढली जावी. असे आम्ही प्रयत्न करतं अहोत. माञ जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured