Type Here to Get Search Results !

" ...यामुळे बस नदीत कोसळली"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले अपघाताचे कारण!




मुंबई: मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळली. पण या बसचा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अजुनही समोर आले नव्हते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अपघात कसा झाला याचे कारण सांगितले आहे. समोरुन येत असलेल्या दुचाकीला वाचवत असताना बस नदीत कोसळली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.



इंदूरमध्ये बसचा झालेला अपघात हा समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवताना झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्यशासनाकडून १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोललो आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


दरम्यान,  मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies