Type Here to Get Search Results !

भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात प्रौढाचा जागीच मृत्यु!



जळगाव : धुळ्याकडून कारने घराकडे येत असतांना बोरविहीरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात मेहूणबारे येथील 50 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यु झाला.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील धैर्यशील गुलाबराव चव्हाण (वय 50) हे आपल्या कारने धुळ्याहून मेहूणबारे येथे घरी येत होते. त्यानंतर धुळे- चाळीसगाव रस्त्यावर बोरविहीर फाट्यावजवळ कन्हैया हॉटेलच्या समोर औरंगाबादकडून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत  त्यांचा मृत्यु झाला. 


दरम्यान,  ही घटना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व बहीण असा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies