Type Here to Get Search Results !

पतीने विधवा वहिनीसोबत मिळून, पत्नीला जिवंत जाळले!



बांदा : उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एका पतीने विधवा वहिनीसोबत मिळून आपल्याच पत्नीच्या अंगावर डिझेल टाकले अन् तिला पेटवून दिले. या घटनेत पत्नी भाजली. तिला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात गुरूवारी (14 जुलै) दुपारी घडली. महिलेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संशयित आरोपी वहिनी आणि मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. तारादेवी असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  मृत तारादेवी हिचा पत्नी सुलेभानचे मोठ्या भावाची पत्नी अनुपमा सोबत अनैतिक संबध होते. सुलेभानच्या मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने अनुपमा सुलेभान आणि तारादेवी यांच्यासोबतच राहत होती. मृत ताराबाईने मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले की, माझे पती आणि जेठानी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा मला संशय आला होता.  'गुरूवारी रात्री (14 जुलै) मी पतीला अनुपमा यांच्या खोलीत जाताना बघितले. त्यानंतर मी खिडकीतून डोकावून बघितले असता, दोघेही मला आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. मी आरडाओरड केल्यानंतर दोघांनीही मला पकडले, मारहाण केली. त्यानंतर अंगावर डिझेल ओतून मला जिवंत जाळले'. असे तारादेवी हिने मृत्युपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.



दरम्यान, मृत तारादेवीच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी पती सुलेभान आणि जेठानी अनुपमा दोघांनाही अटक केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies