आजचे दिनविशेष; जाणून घ्या महत्वाच्या घटना!आटपाडी: आज 30 जुलै. संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 30 जुलै : International Friendship Day

संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.1962 : ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे 8,030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.1994 : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: 8 ऑगस्ट 1926)सन 1909 साली अमेरिकन वैमानिक आणि शास्त्रज्ञ राईट बंधू यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.सन 1928 साली पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured