Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग: तासगावातून एका दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण : नर्स असल्याचे भासवून महिलेचे कृत्य: घटना सीसीटीव्हीत कैद!



तासगाव: नर्स असल्याचे भासवून एका महिलेने येथील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.हि घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.


याबाबत माहिती अशी कि, येथील सिद्धेश्वर चौकातील डॉअंजली पाटील यांच्या दवाखान्यात एक महिला प्रसूत झाली.आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वार्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील bag मध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने हॉस्पिटलसह शहरामध्ये खळबळ उडाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies