Type Here to Get Search Results !

ऑफिसमध्ये इंजिनिअरांकडून महिलेचा छळ; त्रासाला कंटाळून महिलेने...!अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रेल्वेच्या इंजिनांचे भाग तयार करणाऱ्या या कंपनीत पीडित महिला ही गेल्या ६ वर्षांपासून कंम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करते. या महिलेचा तिच्या ऑफिसमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या दोघांनी अश्लील शेरेबाजी करणे, शरीराला चुकीचे स्पर्श करणे, बदनामी करणे अशा पद्धतीने छळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.तसेच, सातत्याने या महिलेला ऑफिसमध्ये काम न देणे, दुसऱ्या विभागात बदली करणे, अपमानास्पद वागणूक देणे अशा पद्धतीने छळ सुरू असल्याचा आरोप या महिलेने केले. या सगळ्याबाबत या महिलेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. याशिवाय या त्रासाला कंटाळून महिलेने डिसेंबर महिन्यात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, सदर महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी कंपनीचे २ इंजिनिअर आणि एक विभागप्रमुख अशा तिघांविरोधात आयपीसी ३५४ आणि ५०९ अन्वये विनयभंग आणि विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies