Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे ‘हे’ खासदार मातोश्रीवरील बैठकीत गैरहजर; राजकीय चर्चांना उधाण!



मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.  याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांसोबत बैठक घेतली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेचे १२ खासदार उपस्थित असून इतर ७ खासदार गैरहजर असल्याने  राजकीय चर्चांना उधाण आले. 



आता, आजच्या मातोश्रीवर असलेल्या बैठकीला शिवसेनेचे ७ खासदार गैरहजर असल्याने पुन्हा एकदा शिवसेनेची कोंडी झाली आहे. बैठकीला गैरहजर असलेले खासदार बंडखोरी करुन शिंदे गटाला पाठिंबा देतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 


शिवसेनेचे अनुपस्थित खासदार खालीलप्रमाणे:

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

परभणी - संजय जाधव

कोल्हापूर - संजय मांडलिक

हिंगोली - हेमंत पाटील

कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे

रामटेक - कृपाल तुमाने

दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies