Type Here to Get Search Results !

विवाहबाह्य संबंधांवरून पतीने पत्नीला मारहाण करत खांद्यावर बसून काढली गावभर धिंड!



मध्य प्रदेश: मध्य प्रदेश राज्यातील देवासमध्ये पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांवरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली, तिचे केस ओढले, तिला जमिनीवरही पाडले. यावरच त्याचे समाधान झाले नाही तर पत्नीच्या खांद्यावर बसून गावभर आपल्याच पत्नीची धिंड काढली तसेच पत्नीला चपलांचा हार घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  या महिलेला तीन मुले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून ती तिच्या प्रियकरा सोबत राहत होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. 



दरम्यान, देवासचे अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, तिच्या पतीसह ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देवास जिल्ह्यातील पुंजापुरा येथील बोरपाडाव गावात एक दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies