Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार १४ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल. अति उत्साह दाखवू नका.समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. 



वृषभ:

बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. नातेवाईक नाराज होऊ शकतात. आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. डोळ्यांची काळजी घ्यावी. 



मिथुन:

मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. अनावश्यक खर्च टाळावेत.  मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. 



कर्क:

इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कठोर परिश्रमाचे चीज होईल.  संधीचे सोने करायला शिका. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. 



सिंह:

डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका.



कन्या:

कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. पालकांचे सहकार्य घ्यावे.  मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. 



तूळ:

आजचा दिवस शुभ कारक.  आवडी-निवडीवर अधिक खर्च कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.आवडत्या छंदाला वेळ द्यावा. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. 



वृश्चिक:

प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मित्राला मदत कराल. एखादी घटना मन खिन्न करू शकते. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. 



धनू:

मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल.आहारावर नियंत्रण ठेवावे. रागावर नियंत्रण ठेवावे. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. 



मकर:

कौटुंबिक शांतता जपावी. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे.  स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. 



कुंभ:

जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीत वर्चस्व दाखवाल. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. 



मीन:

चटकन नाराजी दर्शवू नका. कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. स्वभावातील उधळेपणा ओळखावा.  जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies