Type Here to Get Search Results !

विनायक मेटे यांच्या मृत्यूची होणार सीआयडी चौकशी: मुख्यमंत्री शिंदेनी दिले आदेश!



मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले आहेत. मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शंका उपस्थित केली होती. 



दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आज शिंदे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies