Type Here to Get Search Results !

अभिनेत्री कंगना रनौत फिल्मफेअरविरोधात जाणार कोर्टात; कारण ऐकून बसेल धक्का!



मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. परंतु, यावेळेस कंगनाने थेट सोशल मीडियावर फिल्मफेअर विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच सतत नकार देऊनही कंगनाला पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे तिने फिल्मफेअरविरोधात कोर्टात जाणार असल्याचे सांगिलते आहे.



कंगना रनौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत दावा केला आहे की, नाही म्हटल्यानंतरही फिल्मफेअर या नामांकित चित्रपट मासिकाने त्यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच, 'थलायवी' या चित्रपटालाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.



दरम्यान ‘फिल्मफेअर’ या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागामध्ये कंगना रनौत हिला नामांकन देण्यात आले आहे. कंगनाला हे नामांकन तिच्या 'थलायवी' या चित्रपटासाठी मिळाले आहे. मात्र, कंगनाने आता या मॅगझिनवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies