Type Here to Get Search Results !

शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही; शिवसैनिकांचा निर्धार!



मुंबई:  महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पुढील निवडणुकीत चितपट करण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिकांनी रणशिंग फुंकले. शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुका विधानसभा मतदार संघातील नवी मुंबई स्थित रहिवाश्यांचा मेळावा कोपरखैरणेत संपन्न झाला.



शिवसेना उपनेते नितीन भानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. तसेच, बंडखोरी झाली असली तरी शिवसैनिक मात्र शिवसेने सोबतच असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते नितीन भानुगडे पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले गद्दारांना शिवसैनिकच आता त्यांची जागा दाखवतील.



याशिवाय, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या 40 पैकी 39 आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बघून घेतील मात्र शंभूराज देसाई यांना मात्र पाटण तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी पाटण तालुक्यातील शिवसैनिकांनी मेळाव्यात केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies