Type Here to Get Search Results !

प्रेयसीने इन्स्टाग्रामवर मुलांना अनफॉलो करण्यास दिला नकार त्यानंतर 22 वर्षीय तरुणाने....!



मुंबई : नागपूरमध्ये प्रेयसीने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर मुलांना अनफॉलो करण्यास नकार दिल्याने नैराश्येतून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. रोहन सिंह कपूर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी सीताबर्डी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.



माहितीनुसार, रोहनची प्रेयसी सोशल मीडिया साईट इन्साग्रामवर अॅक्टिव्ह होती. इन्टाग्रामवर ती काही पुरुषांना फॉलो करत होती. यावरुन रोहनमध्ये आणि तरुणीमध्ये वारंवार वाद होत होते. रोहन तरुणीला इन्स्टाग्रामवर पुरुषांना अनफॉलो करायला सांगत होता. मात्र तरुणी ऐकत नव्हती.परंतु,  रोहनच्या डोक्यावर खूप कर्ज होते. या कारणामुळेही तो नैराश्येत राहत होता. यामुळे त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याने तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला आपल्या भावाला याची माहिती देण्यास सांगितली. त्यानंतर वीरपालने (भावाने)  तात्काळ घटनास्थळी दाखल होत रोहन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.




दरम्यान,  याप्रकरणी तरुणाची प्रेयसी आणि कुटुंबीयांचीही चौकशी करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies