Type Here to Get Search Results !

पाकिस्तानने 'या' देशाला कुख्यात अतिरेकी मसूद अजहरच्या अटकेची केली मागणी!



मुंबई : अफगणिस्तानला पाकिस्तानने पत्र लिहून कुख्यात अतिरेकी मसूद अजहर याच्या अटकेची मागणी केली आहे.


 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, अतिरेकी मसूद अजहर हा अफगणिस्तानच्या नंगरहार किंवा कुन्हरमध्ये असल्याची शक्यता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे. तसा उल्लेख पत्रातही करण्यात आला आहे. मसूद अजहर याला शोधून त्याला अटक केली जावी, अशी मागणी पत्र लिहून अफगणिस्तानकडे केली असल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. 



दरम्यान, पाकिस्तानमधील विदेश मंत्रालयाने सदर पत्र अफगणिस्तानच्या अधिकाऱ्यांना लिहिले असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies