Type Here to Get Search Results !

"आम्हाला राहुल गांधी हेच अध्यक्ष हवेत"!



नवी दिल्ली : "आम्हाला राहुल गांधी अध्यक्ष हवेत" असे पोस्टर कॉंग्रेसच्या महारॅलीत झळकले आहेत. देशातील वाढत्या महागाई विरोधात राजधानी दिल्ली येथे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या रामलीला मैदानावर महागाई विरोधात हल्ला बोल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, यावेळी राहुल गांधीच्या समर्थनार्थ हे पोस्टर झळकले आहेत.



दरम्यान, कॉंग्रेसच्या या महारॅलीत राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं यासाठी एक पोस्टर झळकवण्यात येत आहे. येत्या १९ ऑक्टोबरला कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्ष पद स्वीकारावं म्हणून आग्रह धरत आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी आपण अध्यक्ष होणार नाही असे वारंवार सांगितले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies