Type Here to Get Search Results !

आटपाडी : गळवेवाडी येथील विवाहतेचा पैशासाठी छळ : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील विवाहतेचा पैशासाठी छळ करून मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात फिर्यादी वनिता काळेल यांच्या फिर्यादी नुसार आरोपी  1. विश्वास विष्णु काळेल 2. सुलन विष्णु काळेल 3. विष्णु नारायण काळेल सर्व रा. सोमेवाडी ता. सांगोला जि. यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.



याबाबत अधिक माहिती अशी, सौ.वनिता विश्वास काळेल वय-23 वर्षे व्यवसाय- घरकाम सध्या रा. गळवेवाडी ता. आटपाडी जि. सांगली यांचा विवाह सोमेवाडी ता.सांगोला, जि. सोलापूर येथील विश्वास विष्णू काळेल यांच्या बरोबर झाला आहे. आरोपी  विश्वास यांने दारु पिवुन येवुन फिर्यादीस गॅरेजचे व लग्नाचे कर्ज झाले आहे व बहिनीचे लग्न करायचे आहे आहे असे म्हणुन एकुण सहा लाख पन्नास हजार रुपये फिर्यादीचे वडीलांचे कडुन देवूनही फिर्यादीस लाथाबुक्कांनी मारहाण, शिवीगाळी करुन अहमदाबाद येथे रात्री आरोपी नं.1 विश्वास आरोपी नं. 2 सुलन यांनी घराचा दरवाजा व खिडक्या बंद करुन आरोपी नं.2 हिने फिर्यादीचे दोन्ही पाय पकडुन आरोपी नं.1 याने फिर्यादीचा गळा आवळून शिवीगाळी करुन दोन दिवस फिर्यादीस उपाशी ठेवुन व आरोपी नं.03 विष्णु यांनी फिर्यादीस तु तुझ्या पतीचे व सासुचे का एकत नाही तु तुझ्या वडीलांकडुन अजुन राहिले कर्ज भागवणेसाठी तेरा लाख रुपयेची पैसे घेवुन ये तरच तुला आम्ही नांदवेल असे म्हणुन फिर्यादीस शारिरीक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद दिली आहे.


आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास  पो.नि. मेमाणे आदेशाने  पोहेकाँ शेजाळ हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies