Type Here to Get Search Results !

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत!मुंबई: अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ


● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र


● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र


● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र


● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र


● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र


● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र


● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र


● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र


● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र


एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र


एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies