Type Here to Get Search Results !

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला श्रीकांत शिंदेचा फोटो व्हायरल” श्रीकांत शिंदे यांचे मोठे स्पष्टीकरण!



मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादीकडून ट्विट करण्यात आला होता. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या  खुर्चीवर बसले आहेत, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र आता यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 



मी खासदार आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही हे मला कळतं. हे घरचं ऑफीस आहे, मी ज्या खुर्चीवर बसलो आहे ती माझीच खुर्ची आहे. मात्र माझ्या मागे जो बोर्ड दिसत आहे तो तीथला नाही. माझ्या मागे बोर्ड होता याची मला कल्पना देखील नव्हती, असे स्पष्टीकरण आता श्रीकांत शिंदे यांनी दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies