Type Here to Get Search Results !

“आमदार रोहित पवारांनी राजनामा दिलाच तर मी राजीनामा देऊन रणांगणात उतरणार....”!



अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कर्जत- मतदारसंघाची निवडणूकित प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घ्यावे अशी मागणी होत होती. तीनवर्षानंतर भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्य म्हणून पाठविले आहे. राम शिंदे हे आमदार झाले असले तरी त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा असं खुलं चॅलेंज केले आहे.



भारतीय घटनेच्या नियमानुसार विधान परिषद सदस्य हा सदस्यातुन निवडून येतो तर लोकांमधून निवडून आलेला विधानसभा सदस्य असतो.त्यामुळे विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लागत नाही, राजीनामा देऊन चालत नाही असे म्हणत पवारांनी राजीनामा देण्याची मागणीच शिंदे यांनी केली आहे.व विधानसभा सदस्यांनी राजीनामा दिला तर मी निवडणुकीला तयार आहे असे म्हणत राम शिंदे यांनी खुलं चॅलेंज दिले आहे.




आमदार रोहित पवारांनी राजनामा दिलाच तर मी राजीनामा देऊन रणांगणात उतरलोच समजा असे राम शिंदे यांनी म्हंटलंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies