Type Here to Get Search Results !

“....म्हणून चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमूत्राने धुवायला पाहिजे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



औरंगाबादः शिंदे गटातील पैठणचे आमदार आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पैठणमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले. या पार्श्वभूमीवर संदिपान भूमरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.



संदिपान भूमरे म्हणाले, “शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचं डोकंच आता काही काम करत नाहीये. पैठणच्या सभेतील गर्दी पाहून त्यांना काही सूचत नाही. त्यामुळे खैरेंचं डोकंच आता गोमूत्राने धुवायला पाहिजे, असे वक्तव्य रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी केले आहे.


 

दरम्यान, संदिपान भूमरे यांच्या मतदार संघातला महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट भूमरे यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. भूमरे यांच्या जावयानेच रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. मात्र हा आरोप भूमरे यांनी फेटाळला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies